प्रणिती शिंदे यांना उत्तरच्या 36 गावातून 13 हजाराचा लीड ; तर त्या 80 हजाराच्या फरकाने विजयी होणार ; काँग्रेसच्या या नेत्याचा अंदाज
सोलापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होणार आहे अनेकांनी आपापले अंदाज बांधले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते या दोन युवा नेत्यांमध्ये काटे की टक्कर झाली.
एकीकडे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राम सातपुते हे एक लाखाच्या प्रकारे विजयी होतील असा अंदाज बांधत आहेत तर दुसरीकडे प्रणिती शिंदे या किमान 50 हजाराच्या मताधिक्याने विजय होतील असे काँग्रेस कार्यकर्ते सांगत आहेत. या निवडणुकीत पैजा ही लागल्या आहेत.
दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तर सोलापूर तालुक्यातील नेते भारत जाधव यांनी मात्र वेगळाच अंदाज बांधला असून उत्तर सोलापूर तालुक्याच्या छत्तीस गावांमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 13500 इतके मताधिक्य मिळेल.
उत्तर सोलापूर तालुक्याचा विचार करता दक्षिण विधानसभा मतदारसंघाला जोडलेली बारा गावे येथून काँग्रेस पक्षाला 2686 मताचा लीड मिळेल तर सोलापूर शहर उत्तर मतदार संघाला जोडलेल्या दोन गावातून 839 मताचा लीड काँग्रेस पक्षाला मिळेल तर मोहोळ मतदार संघाला जोडलेल्या 24 गावातून 9982 मताचा लीड काँग्रेस पक्षाला मिळेल एकंदरीत एकूण 36 गावांमधून काँग्रेस पक्षाला मिळणारा लीड तेरा हजार पाचशे सात इतका राहील.
भारत जाधव यांनी एकूण मतदार संघात प्रणिती शिंदे या 80 ते ८५ हजाराच्या फरकाने विजय होतील असा दावा केला असून अक्कलकोट तालुक्यातून भाजपाला साधारण: 15 ते 20,000 चा लीड मिळेल त्याचबरोबर शहर उत्तर म्हणून भाजपाला 30000 ते 35000 चा लीड मिळेल तर उर्वरित सोलापूर शहर मध्य मधून काँग्रेसला 50 ते 55 हजार चा लीड मिळेल, मोहोळ मतदार संघातून काँग्रेसला 35 ते 40 हजाराचा लीड मिळेल, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला 20 ते 25 हजारचा लीड मिळेल तर मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून 30 ते 35 हजाराचा लीड काँग्रेसला मिळेल. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे ह्या साधारण: 80 ते 83 हजार मतांनी विजयी होतील असा अंदाज बांधला आहे.