सोलापुरात गौरी भारत गॅस एजन्सीने ग्राहकांना दिले सुरक्षेचे प्रशिक्षण
सोलापूर : गौरी भारतगॅस एजन्सीच्या वतीने गरिबी हटाव नंबर २, विजापूर रोड येथे एलपीजी (गॅस) सुरक्षा शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरास भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, सोलापूरचे टेरिटरी मॅनेजर प्रविण यादव, विक्री व्यवस्थापक रघुकुमार तसेच गौरी भारतगॅस एजन्सीचे वितरक मनोज यलगुलवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या सुरक्षा शिबिर कार्यक्रमास एकूण 65 महिला आणि 10 पुरुष गॅस ग्राहक उपस्थित होते.
यावेळी प्रवीण यादव यांनी गॅस सुरक्षा संदर्भात सखोल माहिती दिली. त्यामध्ये गॅस सुरक्षतेचे खालील पाच मंत्रांची विस्तारीत माहिती दिली.
१) शेगडी बंद असताना आणि रात्री झोपण्याअगोदर रेग्युलेटरचं बटण बंद करावे.
२) शेगडी जमिनीवर ठेवू नये. शेगडी नेहमी सिलेंडर पेक्षा उंच अशा किचन कटटयावर ठेवावे.
३) सिलेंडर घेते वेळी वजन आणि लिकेज चेक करुन घ्यावे.
४) दर पाच वर्षानी एकदा गॅसची सुरक्षा होज आपल्या मेकॅनिक कडून तपासून घ्यावी.
५) गॅसचा वास आल्यावर कृपया रेग्युलेटर बंद करावे, लाईटचे बटन चालू / बंद करु नये वा लगेच आपल्या गॅस एजन्सी / आपतकालीन मोबाईल नंबर 1906 वर त्वरीत कळवावे.
गॅस वापरताना गॅसचे अपघात होऊ नये या संदर्भात काय काळजी घ्यावी याबददल उदाहरणासह उपस्थित महिलांना माहिती सांगितली. कार्यक्रमात उपस्थितीत महिलांना लायटरचे मोफत वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरी भारतगॅस एजन्सीचे सर्व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.