सोलापूर : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे काम मागील चार महिन्यांपासून ठप्प झाले आहे. त्याला कारणेही तशीच आहेत या चार महिन्यात पाच ते सहा वेळा शिक्षणाधिकारी बदलले गेले आहेत त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द झाली. त्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक संजय बानुर यांचाही सहभाग होता.
माध्यमिक विभागात सोमवारी शिक्षण उपसंचालक हे आले असताना केवळ एकच क्लार्क उपस्थित होता. कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिंदे यांच्याकडे दोन्हीकडेचा कार्यभार असलाने ते नक्की कुठे असतात हेच कळत नाही. त्यांचाही फोन सतत बंद असतो. काल शिक्षणाधिका-यांना त्यांच्या उपस्थिती बाबत विचारले असता त्यांनाही कसलीही कल्पना नसल्याचे सांगितले. दोनदा फोन लावलाय पण लागला नाही असे तृप्ती अंधारे यांनी सांगितले.
आधीच तीन महिन्यापासून भरपूर कामं पेंडींग आहेत. त्यात कर्मचारी स्थिर नाहीत. फोन बंद ठेवतात. त्यानुळे कामासाठी आलेल्या कर्मचा-यांमधे तीव्र संताप आहे. बानूर यांच्या जागी आलेले विक्रम शहा हे गेली आठ पंधरा दिवसापासून आजारी रजेवर आहेत. त्यांच्या कार्यासनाची कामे कोणी करावीत हा प्रश्न आहे. आधीच प्रत्येकाकडे कामाचा प्रचंड पेंन्डसी आहे. निलेश कुलकणी हे स्वतःच्या सोयीने ये जा करत आहेत. आणि फक्त विशेष फायलींवरच लक्ष ठेवून काम करत असल्याची चर्चा आहे.
एकूणच चित्र पाहिले असता माध्यमिक विभाग पूर्णतः अस्थिर झाला आहे. कोर्टकेसेस, माहिती अधिकार, शालार्थ अशी अनेक प्रकरणे सध्या पेंडींग आहेत. कार्यालयातील जूने सर्वच कर्मचारी काढून नविन कर्मचारी दिल्याने माध्यमिक विभागाची अवस्था अत्यॅत वाईट झाल्याचे दिसते.
संजय बानुर हे सोलापूर शहरासह अक्कलकोट दक्षिण उत्तर सोलापूर तालुक्याचे कामकाज पाहत होते. परंतु त्यांचे प्रतिनियुक्ती रद्द झाल्याने कामकाज ठप्प झाले आहे पुन्हा त्या टेबलवर बानूर यांना घ्यावे यासाठी खासदार धनंजय महाडिक सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासह राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ, जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अशा सर्वांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे पत्र देऊन मागणी केली आहे. एकूणच खासदार आमदारांसह सर्व संघटना बानूर यांच्या बाजूने एकवटल्यामुळे आता सीईओ आव्हाळे या काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.