सोलापुरात देगाव जवळ दुचाकीचा भीषण अपघात ; एक जण जागीच ठार तर दुसरा अतिगंभीर
सोलापूर : सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील सोलापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील देगाव गावाजवळ दुचाकींचा भीषण अपघात होऊन एक युवक जागेस मरण पावला तर दुसरा युवक अति गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी जवळच सीएनएस हॉस्पीटल मध्ये हलवण्यात आले आहे.
अपघात सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान घडला. अभिषेक हेगलाडे वय 21 वर्ष राहणार देगाव असे मयत युवकाचे नाव आहे तर जखमीचे नाव सुदर्शन काळे असून हा सुद्धा राहणार देगावचा आहे. मयत व जखमी युवक हे दोघे शाइन क्रमांक एम एच 13 DR 2098 या गाडीवरून सोलापूर कडून देगाव कडे जात होते, ते दोघे कोयना नगर जवळ आल्यावर समोरून MH 13 DN 4815 ही TVS Excel गाडी अडवी आली. त्या गाडीवरील माणसाला वाचविण्याच्या नादात या दोघांनी कट मारला असता बॅलन्स जावून ते रस्त्यांच्या मध्ये असलेल्या डिव्हायडरला जाऊन धडकले.
मयत युवक अभिषेकचे डोके सोलार लॅम्पला खांबाला जाऊन धडकले आणि जबर मार लागून तो जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली.
तर दुसरा युवक सुदर्शन काळे तो सुद्धा गाडीवरून उडून त्यालाही गंभीर जखम झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. जखमी युवकाला उपचारासाठी CNS हॉस्पिटलकडे पाठवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली. हा अपघात होताच या भागातील शिवसेना नेते गणेश वानकरसह देगाव मधील ग्रामस्थांची मोठी गर्दी त्या ठिकाणी झाल्याचे चित्र होते. त्या युवकाच्या मृत्यूबद्दल गावातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळण्यात गणेश वानकर, मनसेचे शहराध्यक्ष जैनोद्दिन शेख यांचे सहकार्य लाभले.