आडम मास्तर यांनी बजावला कुटुंबासह मतदानाचा हक्क ; मोदींवरचा विश्वास उडाला ते सत्तेतून हद्दपार होणार
सोलापूर : माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर हे आपल्या परिवारासह बापूजी नगर येथील ज्ञानसागर प्रशाला येथे त्यांच्या पत्नी कामिनी आडम, मुलगा डॉ.किरण आडम, मुलगी निलीमा आडम यांच्यासह आज सकाळी ठीक 8:15 वाजता मतदानाचा हक्क बजावला. बापूजी नगर भागात मतदानासाठी मोठी गर्दी झाली होती.
माध्यमांशी बोलताना आडम म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा लोकांचा विश्वास उडाला आहे, जानेवारी महिन्यात रे नगर या ठिकाणी त्यांच्या सभेला झालेली गर्दी आणि परवा होम मैदानावर त्यांच्या सभेची गर्दी पाहता लोकांच्या लक्षात येते, यंदा मोदी हे पंतप्रधान पदावरून हद्दपार होतील आणि इंडिया आघाडीचे सरकार भारतातील येईल, 400 पार चा नारा दिला जातो परंतु 272 जागाही त्यांच्या येणे मुश्कील आहेत याचं टेन्शन भाजपला असल्याचे ते म्हणाले.