सोलापूर : परीट (धोबी) समाज सेवाभावी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने पार्क चौपाटीवर असलेल्या शमीवृक्षाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छतेचा मोहिमेचा शुभारंभ माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता करण्यात आला.
विजयादशमीचे सोनं लुटताना अस्वच्छ झालेला परिसर स्वच्छ करुन संघटनेच्या स्वच्छतादुतांनी स्वच्छतेचे सिमोल्लंगण केले. आपण संत गाडगेबाबा यांच्या जयंती, पुण्यतिथी दिवशी स्वच्छता मोहीम राबवतो. मात्र हा समाज त्यांचे विचार घेऊन सेवाभावी वृत्तीने काम करीत असल्याचे माने यांनी कौतुक केले.
राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांचा पुतळा शहरात बसवण्याची आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहात या मागणीसाठी मी आपल्या पाठीशी असल्याचे माजी आमदार माने यांनी सांगितले.
यावेळी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष अजय सोनटक्के, शहराध्यक्ष विनोद भोसले, राहुल काटकर, महेश वाघमारे, पोपट काटकर, रमाकांत साळूंखे, सुभाष गायकवाड, महादेव शिंदे, नागेश काटकर, गणेश वारे, दत्तात्रय दळवी, सोमनाथ काटकर, अरुण सोनटक्के, महेश वाघमारे, महेश काटकर, संदीप भोसले, अंकुश ननवरे, आकाश ताटवे, सागर गवळी, सचिन मस्के, प्रवीण ननवरे, सन्मित्र काटकर, अमृत काटकर, बालाजी काटकर, प्रसाद काटकर, प्रफुल्ल काटकर, जयश्री साळूंखे, महादेवी घोडके, गोदावरी शिंदे, रेणुका सोनटक्के यांच्यासह बहुसंख्य परीट बांधव उपस्थित होते.