सोलापुरात भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा ; नेहा हिरेमठ हत्येचा निषेध ; पहा व्हिडिओ
सोलापूर : कर्नाटकातील सौंदत्ती या ठिकाणी झालेल्या नेहा हिरेमठ तरुणीच्या हत्येच्या विरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढून लव्ह जिहादवर प्रतिबंधात्मक कठोर कायदा करण्याची मागणी करण्यात आली.
कर्नाटकातील हुबळी सौंदत्ती या ठिकाणी नेहा हिरेमठ या तरुणीची निघृण हत्या करण्यात आली. याच घटनेच्या निषेधार्थ सोलापूर शहरातील मल्लिकार्जुन मंदिरापासून हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यामोर्चामध्ये महिलांनी तसेच हिंदू संघटनांनी सहभाग नोंदवत रॅली काढली. हातामध्ये भगवे ध्वज आणि नेहा हिरेमठ हीचे पोस्टर घेऊन लव जिहादवर प्रतिबंधात्मक कठोर कायदा करण्याची मागणी केली तसेच आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.
मल्लिकार्जुन मंदिरापासून निघालेला मोर्चा पंजाब तालीम, चौपाड, नवी पेठ, सरस्वती चौक मार्गे हुतात्मा चौक इथे विसर्जित होऊन जाहीर सभेत रूपांतर झाले. सदरच्या घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी मोर्चा परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तसेच संवेदनशील भागात कमांडो आणि बी.एस.एफ सेक्युरिटी तैनात करण्यात आली होती.