बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन विहिरीचे पूजन करून अतिश बनसोडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ
सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आतिश बनसोडे यांनी आपल्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला आहे. बनसोडे यांना सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात निवडणूक लढवताना विहीर हे चिन्ह मिळाले आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग या ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या विहिरीचे पूजन करून आतिश बनसोडे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी बोलताना आतिश बनसोडे म्हणाले, ही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. प्रस्थापित राजकारणी नाही. मला सोलापूरकरांच्या प्रत्येक प्रश्नाची जाण आहे, त्यामुळे संसदेत मी आपले प्रश्न मांडू शकतो. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. राहुल गायकवाड सारख्या माणसाने स्वतःचा स्वाभिमान काँग्रेस सारख्या पक्षाच्या पायरीवर गहाण ठेवला बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यामुळे जनता पेटून उठली आहे, तो रोष मतपेटीतून दाखवून देईल.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच उमेदवारातील बनसोडे यांनी सोलापूरचा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात आरती करून बनसोडे यांनी दर्शन घेतले.