डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी सीईओ म्हणून उभी ; झेडपी प्रशासक मनिषा आव्हाळे ; जिल्हा परिषदेत अभिवादन
सोलापूर – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय देणे साठी अहोरात्र परिश्रम केले. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करा. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती समारंभाचे आयोजन करणेत आले होते. दि. १० एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात समता पंधरवाड्याचे आयोजन करणेत आले आहे.
जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटना, यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. मराठा सेवा संघाच्या वतीने भीम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते करणेत आले. या प्रसंगी व्याख्याते डाॅ. रविंद्र चिंचोळकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पारसे, कास्ट्राईबचे अरूण क्षिरसागर, मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे, लिपीकवर्गीय संघटनेचे राजेश देशपांडे,
कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.
बाबासाहेब आंबेडकर यांनी गरीबांच्या विकासासाठी काम केले. असे सांगून सिंईओ मनिषा आव्हाळे पुढे म्हणाल्या, माझे स्पर्धा परिक्षाचा पाया हा बाबासाहेबांचा विचाराचा आहे. या महामानवांपुढे आपले काम खुप छोटे आहे. बाबासाहेब यांचे वाचन व लेखन खुप होते. त्यांच्या विचाराचे पुढे आपण खुप नगन्य आहोत. अनेक पुस्तकांचे मी वाचन केले. बाबासाहेब यांचे फोटोला हार घालून अभिवादन करणे बरोबरच त्यांचे विचार देखील आत्मसात करा. जिल्हा परिषद विकासाचे केंद्र आहे. आपणास दिलेले अधिकार शेवटच्या घटका साठी वापरणे आवश्यक आहे. असेही सिईओ आव्हाळे यांनी सांगून आपला जिवनपट सांगून कवी नामदेव ढसाळ यांचे प्रेरणादायी कविता ऐकवली.
प्रास्तविक समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले. आर्थिक शोषणाची भुमिका प्राब्लेम आॅफ रूपीज मध्ये मांडली आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेस उपकर लागू करणेची भुमिका शोधनिबंधात मांडली.
समाज कल्याण विभागाचे विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड, विस्तार अधिकारी संदिप खरबस, एच एम बांगर, सहाय्यक लेखाधिकारी सावळा काळे, यांनी परिश्रम घेतले. स्वानंद म्युझिकल ग्रुप ने भीम गित गायन केले. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद सोलापूर चा वतीने भीम गिताचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी सचिन चव्हाण, दिनेश बनसोडे, यांच् सह मान्यवरांना पुस्तक भेट देणेत आले. कास्ट्राईब संघटनेचे वतीने मिठाईचे वाटप करणेत आले. सुत्रसंचालन विस्तार अधिकारी गुरव यांनी केले. दैनिक प्रबुध्दराज चे जयंती विशेषांकाचे प्रकाशन सिईओ आव्हाळे यांचे हस्ते करणेत आले.
भिम गितांनी दणाणले सभागृह ..!
….. …………
स्वानंद म्युझिकल ग्रुप ने भीम गित गायन केले. या भीम गितांनी यशवंतराव चव्हाण सभागृह दणाणून गेले. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद सोलापूर चा वतीने भीम गिताचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बाबा साहेबांचे जीवनावरील विविध भिम गिते गाऊन जयंती कार्यक्रमात जाण आणली. कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी भिम गिताचे गायन केले.