सोलापुरात रिपाइं नेते राजा सरवदे यांच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना डबल शुभेच्छा
सोलापूर : विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आंबेडकर चौकातील पूर्णकृती पुतळ्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात आले.
पुष्पहार अर्पण करून सुशीलकुमार शिंदे हे खाली उतरत असताना मोर्चामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे हे अभिवादन करण्यासाठी थांबले होते. त्याच वेळेस सुशीलकुमार शिंदे आले तेव्हा सरवदे यांनी “साहेब जयंतीच्या शुभेच्छा, असे म्हणून ताईंना डबल शुभेच्छा” असे म्हणताच शिंदे यांनी “तुमच्या डबल शुभेच्छा मिळाल्या आता काही हरकत नाही” हे वाक्य येताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. काय घडले पहा तो व्हिडिओ….
देशामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष महायुती सोबत आहे सोलापुरात अद्यापही रिपाई महायुतीच्या स्टेजवर दिसलेली नाही.