उत्तर तालुक्यात प्रणिती शिंदेंच्या दौऱ्याला मोठी गर्दी ; दिलीप माने व काका साठे यांची खंबीर साथ
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी माजी आमदार दिलीप माने यांच्यासह प्रथमच उत्तर सोलापूर तालुक्याचा दौरा केला, या दौऱ्यात प्रत्येक गावात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक ठिकाणी जोरदार स्वागत झाले.
या दौऱ्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत जाधव, शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा महीला प्रमुख सिमा पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते.
शुक्रवारी नान्नज, दारफळ गा., भागाईवाडी, कौठाळी, साखरेवाडी, कळमण, पडसाळी, वांगी, वडाळा, रानमसले, दारफळ बि.बि., अकोलेकाटी, कारंबा याठिकाणी गावभेट दौरा केला.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, या निवडणुकीत मी जरी उमेदवार असले तरी आपल्या सर्वांची निवडणूक आहे, 400 पार वगेरे नाही 150 पार पण भाजप जाणार नाही, सर्वत्र रोष आहे, लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे, शेतकरी नाराज आहेत, महागाईने महीला वर्ग वैतागला आहे त्यामुळे या भाजपला आता तडीपार करा असे आवाहन केले.
दिलीप माने म्हणाले, उत्तर तालुका हा सहकार महर्षी ब्रम्हदेव दादा, बळीराम काका साठे, दिलीप माने यांच्या पाठीशी काय राहिला आहे, मला विश्वास आहे की, या लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांना आपल्या तालुक्यातून निश्चितच मोठे मताधिक्य घेतील.