सोलापूर (प्रतिनिधी) 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ मान्यवर प्रेम रतन दमाणी यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे यांनी यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.
दमानी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी माजी महापौर महेश कोठे राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, युवक प्रदेश सचिव प्रशांत बाबर, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम, प्रांतिक सदस्य महेश निकम्बे,महिला आघाडीच्या मनीषा नलावडे, उपाध्यक्ष राम साठे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक सी ए बिराजदार यांची याप्रसंगी उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सत्काराने 85 वर्षाचे प्रेमरतन दमाणी हे भारावून गेले.
महेश कोठे म्हणाले, सोलापूर ते पुणे इंटरसिटी हुतात्मा एक्सप्रेस सुरु करण्यात दमाणी यांचा सिंहाचा वाटा आहे, तसेच त्यांच्या कार्याची दखल घेण्यासारखा विषय म्हणजे सर्व राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका मधून 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांच्या नऊ टक्के अधिकचे व्याजदर मिळते यासाठी त्यांनी प्रयत्न व पाठपुरावा केंद्र सरकार आणि आरबीआय यांच्याकडे केला आहे.
विद्या लोलगे म्हणाल्या, सोलापूर शहरात श्री दमाणी यांनी अनेक संस्था, शाळा, कॉलेज उभे केले. दमाणी ब्लड बँक, दमाणी प्रशाला, दमाणी बीएड कॉलेज, दमाणी कामगार कल्याण केंद्र, जामश्री मिल, प्राणिसंग्रहालय, सध्याची मोतीबाग उभारणीत मोलाचा वाटा आहे, प्रेमरतन दमाणी हे सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे 25 वर्षे अध्यक्ष होते, मध्यवर्ती भागातील दमाणी नगर त्यांनीच वसवले जामश्री मिल चालून 400 लोकांना रोजगार दिला, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक दिनी सत्काराचे खरे मानकरी हे प्रेमरतन दमाणी आहेत.
















