सोलापूर : मंगळवारी सोलापुरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रेल्वे लाईन परिसरातील सेवंथ हिवन या अपार्टमेंटच्या तळघरातील पार्किंग मध्ये आग लागली. तळघरात जाण्यासाठी मोठा मार्ग नसल्याने अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणता आली नाही, आगीच्या धुरामुळे अपार्टमेंटमधील सर्व रहिवासी टेरेसवर धावले, पोलीस प्रशासन दाखल झाले, लोकप्रतिनिधी आले, आजूबाजूचे युवक आले या सर्वांनी मिळून सुमारे तीन तास आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. शेवटी जेसीबी मागवून तळघराच्या काही बाजू फोडून त्यामध्ये अग्निशामक विभागाने पाणी मारून रात्री साडे आठच्या पुढे आग आटोक्यात आणली.
नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही मात्र यातळघरामध्ये पार्किंगच्या ठिकाणी काही स्टोअर करून ठेवण्यात आले होते अशी माहिती समोर येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली अनेक दुचाकी वाहने जळून खाक झाली याप्रकरणी बुधवारी महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्याशी पत्रकारांनी या विषयावर चर्चा केली असता या प्रकरणाची चौकशी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पार्किंगच्या ठिकाणी स्टोअर कोणाच्या परवानगीने करण्यात आले होते कुणाच्या जीविताला धोका झाला असता तर?याची जबाबदारी कुणाची असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.


















