25 हजार बंजारा बांधव धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर ; सोलापुरातून एल्गार
निजाम काळात हैद्राबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा एस.टी. (आदीवासी) म्हणून उल्लेख असल्यामुळे हैद्राबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस.टी.चे आरक्षण मिळावे,यासाठी आता महाराष्ट्रातील बंजारा समाज आक्रमक झाला असून सोलापूर जिल्ह्यातील 25 हजार बंजारा समाज बांधव येत्या 16 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकणार आहे.
समस्त गोर बंजारा समाजाची नियोजन बैठक शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. 16 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संत सेवालाल महाराज यांना अभिवादन करून नेहरू नगर पासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून सुमारे 25 हजाराहून अधिक बंजारा समाज बांधव या मोर्चात सहभागी करण्याचा निर्धार करण्यात आला.
समाजातील मोतीराम चव्हाण, प्रा.भोजराज पवार, सुभाष चव्हाण, अलका राठोड, युवराज राठोड, युवराज चव्हाण, नाम पवार, संदीप राठोड, सचिन चव्हाण, विजय राठोड, सुरेश पवार, लाला राठोड, मोतीराम राठोड, प्रकाश राठोड, बंटी राठोड, शैलजा राठोड, अश्विनी चव्हाण, मेनका राठोड, प्रेमसिंग राठोड, मिथुन चव्हाण, युवराज चव्हाण, सचिन पवार, रतन राठोड, बाळासाहेब राठोड, प्रताप राठोड, प्रविण चव्हाण, दिपक पवार, प्रविण पवार, महेश पवार, बाबु मालक, सुभाष पवार, अशोक चव्हाण, राजेंद्र महाराज, चाचा चव्हाण, सुरेश पवार, शामसुंदर राठोड, अविनाश राठोड, बबलु जाधव, दशरथ चव्हाण, हिरालाल पवार, पांडुरंग पवार, केशव पवार, शिवलाल राठोड, मेजर राठोड, आ.डी.चव्हाण, देसू जाधव, रामु पवार, दामु राठोड, उमाकांत राठोड, गोविंद रजपूत, किरण चव्हाण, धनसिंग राठोड, अशोक रजपूत, फुलसिंग चव्हाण, पृथ्वीराज राठोड, अंकुश राठोड, भगवान चव्हाण, गोविंद राठोड, तुकाराम राठोड, लक्ष्मण पवार, व्यंकटेश राठोड, आत्माराम राठोड, आकाश राठोड, गोरख पवार, सुरेश पवार, सचिन चव्हाण, नामदेव राठोड, नारायण राठोड, किसन पवार, भाऊ राठोड, सखाराम पवार, धर्मा जाधव, मोतीलाल राठोड, बाबु जाधव, हरीसिंग राठोड, राजु राठोड, धर्मराज राठोड, गजानन राठोड, अशोक पवार, मोतीराम जाधव, सुनिल राठोड, दिनेश जाधव, ब्रह्मदेव महाराज हे मान्यवर उपस्थित होते.




















