उत्तर सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांचे कायम वर्चस्व आहे वडाळा ग्रामपंचायतीवर तर सलग साठ वर्ष त्यांनी सत्ता राखली आहे या साठ वर्षात विरोधकांचा एकही सदस्य निवडून आला नसल्याचे चित्र पाहायला मिळतं यावरून काका साठे यांचं वडाळा गावावर किती वर्चस्व आहे याचा अंदाज येतो वडाळा वगळता मात्र बळीराम काका साठे इतर गावांमध्ये भाजप अथवा काँग्रेस सोबत युती करतात यंदा मात्र काका साठे यांनी थेट भाजप सोबत युती केली आहे, नान्नज ,होनसळ, भागाईवाडी, या गावांमध्ये हे चित्र पाहायला मिळाले आहे, ग्रामपंचायतीच्या निकालानंतर काका साठे यांची प्रतिक्रिया घेतले असता त्यांनी भाजप सोबत युती केल्याची कबुली दिली.
सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई
सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई सोलापूरचे पोलीस आयुक्त राजकुमार यांनी एक मोठी कारवाई करताना...