शरद पवार यांच्यावर मला विश्वास आहे, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मला न्याय मिळेल अशी भूमिका शिवसेना नेते महेश कोठे यांनी मांडली.काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले नंतर भाजपच्या संपर्कात आलेले परत शिवसेनेत राहिलेले महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे हे आता शिवसेनेला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत, त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती मात्र पवारांनी काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला, त्यातच अजित पवारांनी सुद्धा महाविकास आघाडीतील एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असे सांगत वेटिंगवर ठेवले, मात्र महेश कोठे गप्प बसले नाहीत त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते शेवटी आता कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय पक्का केला शरद पवार यांची भेट घेऊन शुक्रवार 8 डिसेंबरचा प्रवेश निश्चित केला शुक्रवारी दुपारी ते शिवसेनेचा धनुष्यबाण सोडून हाती घड्याळ घेणार आहेत, त्यापूर्वी शरद पवार हे सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कार्यालयात बैठक घेणार आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात महेश कोठे यांचा प्रवेश होणार आहे याचं पार्श्वभूमीवर सोलापूरच्या राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे, महेश कोठे हे शिवसेना का सोडणार , त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस का निवडली, काँग्रेस आणि भाजप का नाही त्यांच्या सोबत किती जण प्रवेश करणार , विधानसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, दरम्यान हे सर्व प्रश्न महेश कोठे यांच्या समोर उपस्थित केले असता त्यांनी पहा काय सांगितले. शरद पवार यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये निश्चित मला न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कोठे यांच्या सोबत एकही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार नाही, ते स्वतः एकटेच प्रवेश करणार आहेत, शहर उत्तर हा मतदारसंघ त्यांच्या डोळ्यासमोर असून तो राष्ट्रवादी काँग्रेस सुटतो येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कोठे यांची राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये महत्वपूर्ण भूमिका असणार आहे.
सोलापूर पोलिसांनी बिष्णोई गँगमधील दोघांना केली अटक ; प्रकरण आहे तरी काय?
सोलापूर पोलिसांनी बिष्णोई गँगमधील दोघांना केली अटक ; प्रकरण आहे तरी काय? सोलापुरातील स्कॉर्पिओ गाडी चोरी प्रकरणाचे धागेदोरे थेट राजस्थान...