होटगी : सालाबादप्रमाणे श्री बिरलिंगेश्वर महालिंगेश्वर यात्रा महोत्सव मध्ये प्रामपरिंक प्रमाणे विजापूर येथील देवाची फूल आणून शनिवारी सांय ६ वाजता औरद येथील सिध्दोबा पालखी, अंत्रोळी येथील मायक्का देवी पालखी, सोलापूर येथील बिरोबा पालखी होटगीचे खंडोबा, बिरलिंगेश्वर पालखी इ सर्व पालखीचे गाव वेशीत भेटीचे कार्यक्रम संपन्न झाले.
रविवारी सकाळी देवास अभिषेक व फूल अर्पण करून सर्व पालखीचे गाव मिरवणूक काढण्यात आली, यावेळी कोटनाळ येथील पुजारीचे कला संस्कृती नृत्य पार पाडले. आलेल्या सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. या यात्रा उत्सवास माजी आमदार दिलीप माने, जिल्हा काँग्रेसचे सुरेश हसापुरे , माजी जि प सदस्य अमर पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, काँग्रेस तालुकाध्यक्ष हरिष पाटील, सरपंच अतुल गायकवाड, होटगी स्टेशन उपसरपंच सुभाष पाटोळे, पंकज चाबुकस्वार, आदी नेते मंडळी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. या सर्व यात्रा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी धनगर समाजाचे युवक वर्ग, जेष्ठ थोर मंडळी व इतर भक्त गण परिश्रम घेतले.























