माळशिरस तालुक्यातील कोळेगाव दुपडेवस्ती येथील जि.प. प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी मंगेश प्रकाश शेलार याला कोरोनाच्या काळात घरच्या गरीब परिस्थितीमुळे ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी Android Mobile खरेदी करण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. आता माझे शिक्षण कसे होणार असा प्रश्न मंगेशने शिक्षकाला विचारला. तेंव्हा अनिल भगत या शिक्षकांनी काहीतरी प्रयत्न करतो असे वचन मंगेशला दिले आणि त्यांच्या प्रयत्नांना अल्पावधीत यश ही आले.
घडले असे की, माजी आदर्श शिक्षिका स्व.शांताबाई खटके यांचे चिरंजीव शांती कन्स्ट्रक्शन अकलूजचे सर्वेसर्वा विठ्ठल खंदारे यांच्यापुढे सहज बोलता बोलता हा विषय शिक्षक भगत यांनी मांडला…तेंव्हा शिक्षण प्रेमी खंदारे यांनी मदतीचा हात पुढे करत गरजू मंगेशला itel कंपनीचा 6500 रुपये किमतीचा स्मार्ट फोन व वही,पेन , व इतर वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य अकलूज येथे बोलावून भेट दिले.
यावेळी दुपडेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक संजय कांबळे व कोळेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख बापूसाहेब नाईकनवरे , शिक्षणप्रेमी जे.जे.सावंत व विद्यार्थी मंगेश शेलार व पालक प्रकाश शेलार उपस्थित होते..
अशा कोरोनाच्या काळात माणुसकीचे दर्शन घडविणारे खंदारे यांचे सर्व उपस्थितांनी आभार मानले . त्यामुळे दुपडेवस्ती शाळेत मोबाईल बॅंकिंग उपक्रम सुरू झाला असल्याची प्रतिक्रिया केंद्रप्रमुख नाईकनवरे यांनी दिली..दुपडेवस्ती शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनाही हा हा उपक्रम अतिशय स्तुत्य वाटला असून त्यांनी याबाबत खंदारे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.


















