उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज गाव….विकासाच्या दृष्टीने कायम चर्चेत असते, यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण असे पडले होते, निवडून आलेल्या सदस्यांमध्ये दोन पुरुष उमेदवार हे मराठा समाजाचे होते, तरीदेखील या दोन उमेदवारांनी मुस्लिम समाजाच्या उमेदवारास पसंती दाखवून सरपंच केले… आणि गावात प्रथमच इतिहास घडला , हिरज मध्ये प्रथमच मुस्लिम समाजाचा सरपंच झाला. इलाही पटेल यांना सरपंच पदाची संधी मिळाली, पटेल हे एक वर्ष सरपंच राहणार असून इतर सदस्यांमध्ये बद्रीनाथ नागटीलक व प्रशांत साबळे या दोघांना प्रत्येकी दोन-दोन वर्षे सरपंच पदाची संधी देण्याचा निर्णय झाला आहे, एकूणच हा निर्णय पाहता हिरज गावांमध्ये सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडून आले. तर उपसरपंच पदावर गीताबाई लिंबोळे, सुरेखा माळी व सखुबाई साठे यांना संधी मिळणार आहे.
या सर्व निवडी गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष डोंगरे व शिवशेनेचे नेते प्रकाश वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली..