सोलापूर : आई राजा उदे उदे. सदानंदीचा उदे उदे… जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, सियावर प्रभू रामचंद्र की जय, भारत माता की जय असा जयघोष, तुतारीचा गगनभेदी सूर, बँजोचा सुरमयी संगीत लहरीत, हलग्यांचा कडकडाट, लेझीमचा छनछनाटात घोंगडे वस्ती, भवानी पेठ येथील जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या नवरात्र उत्सवाची मिरवणूक मंगळवारी उत्साहात काढण्यात आली.
आकर्षक फुले आणि विद्युत रोषणाईने सजवलेला मिरवणुकीचा रथ उठावदार दिसत होता. या रथाकडे बघून सगळे हात जोडत नतमस्तक होत होते.
मिरवणुकीचा शुभारंभ महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करनकोट, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
शुभारंभप्रसंगी भाजपचे नेते चन्नवीर चिट्टे, अक्षय अंजीखाने, सागर अतनुरे, संदीप महाले, महेश जेऊरे, आप्पा शहापुरे, नरसप्पा मंदकल, बसवराज जाटगल, बंडेप्पा डोळे, सिद्धरामय्या पुराणिक, बसवराज भाईकट्टी, निंगप्पा पुजारी, सिद्राम कलशेट्टी यांच्यासह विश्वस्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जमलेल्या देवी भक्तांनी आई राजा उदो, उदो सदानंदीचा उदे उदे, भारत माता की जय असा जल्लोष करताच मिरवणूक मार्गस्थ झाली. संपूर्ण मिरवणुकीमध्ये सुरेश पाटील हे कार्यकर्त्यांच्या आधार घेत भवानी पेठेपासून ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत मिरवणुकीबरोबर चालत राहिले. अण्णांच्या या स्थितीत चालताना बघून देवीभक्त आणि परिसरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करत अण्णांच्या दीर्घायुष्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छाही दिल्या.
लेझीमधारक व मंडळाचे विश्वस्तांना एक हजाराहून अधिक ड्रेस शिवण्यात आले होते. या ड्रेसवर सगळे पदाधिकारी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होते. यंदा मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकांनी भगव्या रंगाच्या टोपी परिधान केले होते. भगव्या टोपीवर जेमिनी माता, घोंगडे वस्ती असा उल्लेख होता. हे टोपी परिधान केलेले नागरिक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. जेमिनी माता, घोंगडे वस्ती उल्लेख असलेले बॅच सगळ्यांनी आपल्या छातीवर अभिमानाने लावून मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मिरवणूक माणिक चौकात येताच भाजपचे नेते उदयशंकर पाटील यांच्या हस्ते जेमिनी मातेची पूजा करून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर मंडळाचे पदाधिकारी, विश्वस्त हे सिमोल्लंघनासाठी पार्क चौकाकडे मार्गस्थ झाले. पार्क चौकात सिमोल्लंघन कार्यक्रम होताच जयघोष करत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना सोने देऊन विजयीदशमी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि मिठी मारून भावी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. तेथील हा सोहळा संपल्यानंतर सर्व भक्तांनी सिद्धेश्वर मंदिरात दाखल होऊन तेथे धोत्रीकर वस्ती येथील समर्थ मित्र मंडळाने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. नवरात्रोत्सव कालावधीमध्ये सिद्धराज येलदड्डी, अंबादास कोळी, नागनाथ मंदकल, अंबादास काडगुड्डा यांनी पूजा-विधीबरोबरच व्यवस्था पाहिली.
या मिरवणुकीसाठी सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे युवा नेते बिपीन पाटील, उत्सवाचे अध्यक्ष अप्पी पुजारी, पवन तगारे, नवीन गोटीमुक्कुल, व्यंकटेश जाटगल, नागराज डबरे, विजय कोळी, बसलिंगप्पा करली, रवी मंदकल, अक्षय कलशेट्टी, गणेश मल्लुरे, प्रभू पुजारी, प्रशांत गाडेकर, सिद्राम मंदकल, प्रवीण डोळ्ळे, कुमार शिरशीकर, मल्लू कोळी, महेश शिंदे, अनिल पारट, आनंद मासरेड्डी, शरणू मुडल, सिद्राम हळ्ळी, रेवन वग्गुर, सिद्राम शेकसंधी, प्रवीण कैरमकोंडा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.




















