मंगळवेढा पंढरपुर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी बंडखोरी केली आहे तसेच समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक सध्या रंगतदार अवस्थेत असली तरी भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे थेट लढाई असल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे, अशातच मंगळवेढा तालुक्यात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे तीन दिवसात तब्बल 45 गावे पिंजून काढत आपला झंझावात कायम ठेवला आहे, मंगळवेढा तालुक्यातील ज्या गावात ते जातील त्या ठिकाणी केवळ भारतीय जनता पार्टीचे चर्चा आहे दोन विधानसभेच्या निवडणुका एकमेकाच्या विरोधात लढवणारे आमदार प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे हे या निवडणुकीत एकत्र आले आहेत सुमारे सव्वा लाखाहून अधिकचे दोघांचे मतदान विभागले जात होते मात्र हे दोन्ही एकत्र आल्याने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी समाधान आवताडे यांचा सलगर बुद्रूक ,बावची, लवंगी, जंगलगी, मारोळी या भागात प्रचार दौरा होता ते बावची या गावातून मारोळी गावाकडे जाणार होते त्याचवेळी मारोळी गावामध्ये चन्नाप्पा जामगुंड, रेवनसिद्ध मलाबादी, मल्लू साखरे विलास पुकळे, सुरेश कुलाळ, म्हाळाप्पा सुळ, संतोष पाटील, शिवानंद आडकी, काशीराम रवी, प्रदीप पाटील, शिबाळा बिराजदार, हनुमंत ठोंबरे, प्रकाश पोकळे, नामदेव हाके, सचिन सोमुते या कार्यकर्त्यांनी गावात भाजपचे वातावरण तयार केले होते, गावात सर्वत्र भाजपचे झेंडे फडकत होते सभा ज्याठिकाणी होती तिथल्या झाडांना भाजपचे शेले बांधले होते, ज्याठिकाणी आवताडे यांची सभा होती त्याच ठिकाणी त्यांच्या अगोदर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील हे आपले नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह जाऊन पोहोचले, त्यांनी तिथेच आपली सभा चालू केली, भाजपच्या कार्यकर्त्यांनी न अडवता सभा घेऊ दिली मात्र ज्यावेळी राजू शेट्टी हे सभेला उठले तेव्हा हवा सुटली, समोरील भाजपचे झेंडे फडकू लागले , झाडाला बांधलेले शेले हलु लागले हे पाहून राजू शेट्टी यांनी केवळ तीन मिनिटात आपले भाषण संपवून ते पुढे निघून गेले. यानंतर त्यागावात हवा भाजपची अन् सभा राजू शेट्टींची अशी एकच चर्चा ऐकण्यास मिळाली.
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

















