सोलापूर महापालिकेतील एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी हे सभागृहात विषयाची मांडणी कमी मात्र शेरोशायरी मधून सर्वांचे लक्ष वेधून घेतात. शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा होती यावेळी तास-दीड तासाच्या गोंधळानंतर रियाज खरादी हे विषय मांडायला उठले त्यांनी इतर जर जास्त बोलत असतील तर आम्हाला संधी कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला हे ऐकताच विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह इतर सदस्य त्यांच्यावर चिडले आम्ही काय सभागृहात तुमची शेरोशायरी ऐकायला येतो का? असा सवाल केला. यावेळी बराच गोंधळ झाला मात्र शेवटी रियाज खरादी यांनी आपली शायरी सर्वांना ऐकवलीच पहा हा व्हिडीओ…..



















