सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका फिरदोस पटेल काही तरी हटके करण्यात माहीर आहेत, त्या जरी मुस्लिम समाजातील असल्या तरी त्यांच्या कामामुळे इतर समाजात सुध्दा त्या लोकप्रिय आहेत.
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सोलापूरात आगळावेगळा प्रयोग करून सोलापूर शहरातील सुशीलकुमार नाव असलेल्या व्यक्तीला 500 रुपयांचे मोफत पेट्रोल वाटप केले होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम 4 सप्टेंबर रोजी संपन्न झाला होता.
आता सोलापूर शहर मध्य च्या आमदार, प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सुध्दा हटके कार्यक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे. लाडक्या ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरातील प्रणिती नाव असलेल्या युवती आणि महिलांना त्या आता पैठणी भेट देऊन ‘प्रणिती’ या नावाचा सन्मान करणार आहेत.
याबाबत नगरसेविका फिरदोस पटेल यांनी अधिक माहिती दिली……👇👇👇👇


















