सोलापूर : शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग असल्याचे विचार मांडणारे घटनाकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथे डीजेच्या निनादात भिमाच्या गाण्याच्या तालावर भव्य मिरवणूक निघाली. प्रांरभी माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची पुजा करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती रजनी भडकुंबे, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, उत्सव अध्यक्ष अभिजित भडकुंबे, पृथ्वीराज माने युवामंचचे सदस्य अमित भडकुंबे, सोसायटी चेअरमन तुकाराम नवले, तात्या मगर, विकास बनसोडे, अनिल शिंदे, अरुण गायकवाड आदिसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अमरभीम तरुण मंडळ व एस बी ग्रुपच्या संयुक्त लेझीम पथकातील युवक युवतींनी लेझीमचे बहारदार खेळ सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
विवीध भीम गीते तसेच डॉल्बीच्या निनादात तरुणाई बेधुंद होऊन गेली होती. सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत चाललेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


















