उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध नवीन शिवसेना यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली होती नऊ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत एक जागा अनुसूचित जमातीची रिक्त होती त्यासाठी आठ जागेसाठी निवडणूक झाली यामध्ये नव्या शिवसेनेला तीन जागा, जुन्या शिवसेनेला तीन जागा आणि राष्ट्रवादीला दोन जागा असे बलाबल होते त्यामुळे सरपंच कुणाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं सरपंचपद हे ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले होते, मागील काही दिवसात अनेक राजकीय घडामोडी घडल्या , हगलूरचे नेते माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष शिंदे हे गावच्या विकासासाठी एकत्र आले त्यानंतर माजी आमदार दिलीप माने व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व नवीन शिवसेनेची युती झाली, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुभाष शिंदे यांनी दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळत सोबत राहिले, मंगळवारी निवडणूक अधिकारी कल्याण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली सरपंच पदासाठी आरिफा रफिक पठाण यांना पाच तर उपसरपंच पदासाठी कांताबाई दशरथ चव्हाण यांना पाच मते मिळाली आणि ते विजयी झाले यावेळी उत्तर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मीनाक्षी भडकुंबे संभाजी भडकुंबे सदस्य राजकुमार शिंदे सुभाष शिंदे विठ्ठल घुले प्रगती भडकुंबे श्रीरंग नगर कुमार बेळे, विकास बनसोडे अभिजीत भडकुंबे अंगद चव्हाण बापू कोळी खेमू नरवडे ,दत्तात्रय शिंदे त्रिंबक मगर, प्रकाश खराडे ,दिगंबर शिंदे निखिल चव्हाण यांची उपस्थिती होती निवडीनंतर गावात एकच जल्लोष करण्यात आला.
यावेळी नेत्यांनी गावच्या विकासासाठी एकत्रित आल्याचे सांगताना सर्व समाज घटकाला सोबत घेऊन पाच वर्षे गावाचा विकास करू असे आश्वासन दिले.
हगलुर गावच्या इतिहासात प्रथमच सरपंचपदी मुस्लिम समाजाला संधी मिळाली आहे प्रभाग एक मधून संभाजी भडकुंबे यांच्या नेतृत्वाखाली आरिफा रफिक पठाण या विजयी झाल्या होत्या.