सोलापुरात दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला कार्यकर्त्यांचा विरोध ; भाजप कार्यालयासमोरच बसले आंदोलनाला
सोलापूर : सोमवारी सोलापुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात काळी दिवाळी साजरी केली होती मात्र मंगळवारी लगेच दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यालयासमोर काळया टोप्या घालून आंदोलन केले. एकीकडे असेच आंदोलन चालू असताना शेजारीच आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते हे आंदोलन पाहत मजे घेत असल्याचे दिसून आले.
हे भाजपचे सर्व कार्यकर्ते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यांनी नकळत थेट माजी आमदार दिलीप माने यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाला विरोध केल्याचे दिसून येत आहे.
दिलीप माने आणि नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाचे निश्चित केले होते. कार्यकर्त्यांच्या बैठकीत माने यांनी प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
मंगळवारी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सिव्हिल हॉस्पिटल पाठीमागील कार्यालयासमोर काळया टोपी आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी करत भ्रष्टाचारी व कलंकित नेत्यांच्या प्रवेशाला तीव्र शब्दात विरोध दर्शवला.
भाजपमध्ये प्रवेशाला विरोध नाही पक्ष वाढला पाहिजे कार्यकर्ते वाढले पाहिजे परंतु पक्षाने यांचा प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्या चारित्र्य पाहिले पाहिजे त्यांच्यावरील आरोप तपासले पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली दरम्यान कोण काय म्हणाले पहा..