सोमवार 18 ऑक्टोबर रोजी बार्शी रोड येथील स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राध्यापकांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्या संदर्भात बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनात भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम व सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी सहभागी होते.
मात्र संस्थेने अखेर प्राध्यापकांना लेखी आश्वासन दिल्याने हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले दरम्यान अनिल वासन व प्राध्यापक अमित बनसोडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आमची संस्था तांत्रिक अडचणी व आर्थिक स्थिती चे करण पुढे आमची देयके ही थकीत ठेवलेली आहेत.तसेच महाविद्यालय बंद करण्या याबाबत आमच्या प्राध्यापक वृंद ला विश्वासात न घेता पूर्वकल्पना न देता लेखी पत्र दिले.म्हणून आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला. आमच्या सर्व मागण्यांबाबत 23 ऑक्टोबर रोजी ठोस निर्णय घेणार असल्याचे लेखी आश्वासन दिले.यासाठी तूर्तास आंदोलन मागे घेतल्याचे सांगितले…..


















