Saturday, March 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा महाराष्ट्र शासनाने घोषित केला निर्णय ! कॉ.गोदुताई परुळेकर वसाहतीसाठी दिवाळी भेट !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 October 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर दिनांक – 10 हजार विडी कामगारांच्या गोदुताई परुळेकर घरकुल  वसाहतीत  50 हजार च्या घरात लोकसंख्या पोहोचली.तब्बल 15 वर्षांपासून येथील रहिवासी कडून अंतर्गत मूलभूत व पायाभूत सुविधांसाठी शासन आणि प्रशासन दरबारी पाठपुरावा चालू आहे मात्र अनेक अडचणी व राजकीय आकसापोटी कामाला विलंब होत राहिला. महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांनी मंगळवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी कॉ. गोदुताई परुळेकर वसाहतीच्या प्रलंबित प्प्रश्नांबाबत माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांना  मंत्रालयात आमंत्रित केले व स्वतंत्र बैठक घेण्यात आली.

या बैठकीत गोदुताई ला 31 डिसेंबर 21 पर्यंत स्वतंत्र ग्रामपंचायत घोषित करा. रस्ते दुरुस्ती व पुनर्रडांबरीकरणा साठी 1 कोटी 50 लाख निधीची तरतूद करा,जल जीवन मिशन योजना अंतर्गत पाण्यासाठी 30 कोटी निधीची तरतूद करा,तसेच अंतर्गत मलनिस्सारण साठी 60 कोटींची गरज असून स्वच्छ भारत अभिमान योजना अंतर्गत मंजूर करण्याच्या संस्थेच्या प्रस्तावाला  मंत्री महोदयांनी तत्वतः मान्यता दिली आदी महत्त्वाचे निर्णय संबंधित विभागाचे प्रधानसचिव,संबंधित सक्षम अधिकारी यांच्या समक्ष झाले असून संबंधित अधिकारी वर्गाला युद्धपातळीवर कार्यवाही पूर्ण करण्याचे चे आदेश दिले.

वास्तविक पाहता यासाठी वारंवार मोर्चे, धरणे आंदोलन, निवेदने,बैठका, पत्रव्यवहार या सनदशीर मार्गाद्वारे संघर्ष करावा लागला.आजचे हे निर्णय ही त्याची फलश्रुती आहे. असे कॉ.गोदुताई परुळेकर वसाहतीचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आनंद व्यक्त केले.ही कॉ.गोदुताई परुळेकर वसाहती करीता ही दिवाळी भेट असेल असे ही ते म्हणाले.

याविषयी असे की, कॉ. गोदुताई परुळेकर विडी वसाहतीत जवळपास 40 ते 50 हजार लोकसंख्या असुन महिन्याला फक्त तीनच दिवस पाणीपुरवठा होत आहे, 16 वर्षापुर्वी तयार करण्यात आलेले मुख्य रस्ते पुर्णपणे उखडलेले आहे .कॉ आडम मास्तर हे आमदार असताना सन 2005 आणि 2008 मध्ये शासनाकडुन 5 कोटी निधी आणल्यामुळे हे रस्ते झाले आहे, त्याच प्रमाणे लिचपिट, सोपपिट हे 15 वर्षापुर्वी झालेले असुन त्यांचे आयुष्य संपलेले आहे ते केंव्हाही निकामी होऊन प्रंचड घाणीचे साम्राज्य वाढण्याची शक्यता वाढली आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्याकारणाने साफसफाई होत नसल्यामुळे ठिकठिकाणी कचरा साचत आहे त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता जास्त आहे या करिता गेल्या 3/4वर्षा पासुन रस्त्यावरची लढाई , आंदोलन, मोर्चाचे, काढुन शासनाचे लक्ष वेधण्याचे काम सातत्याने कॉ आडम मास्तर हे जिद्दीने पाठपुरावा सुरूच होता त्या अनुंषगांने मा. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दि 12/10/21 रोजी सकाळी 11.00 वाजता मंत्रालयात बैठक बोलावली व ती बैठक 40 मिनटे चालली. सदर बैठकी मध्ये ग्रा. मा. क्र 18 व 19  ह्या रस्ताया वरून दररोज 50,0000 लोकांची वाहतुक असुन दररोज किरकोळ अपघात घडत असुन व काहींना कायमचे अंपगत्व सुध्दा प्राप्त झाले आहे. कामगार व महीला आपला जीव मुठीत धरून कसेबसे राहत आहेत यांची संपुर्ण माहिती कॉ आडम मास्तर यांनी दिली. 

त्यानुसार आजच्या बैठकी मध्ये मा. मंत्री महोदय यांनी या वसाहतीच्या  निवडणुकी च्या आत यांची अंमलबजावणी करावी असे स्पष्ट निर्देश दिले मंत्री महोद्यांनी खालील प्रश्न मान्य करून ते मार्गी लावा असे आदेश दिले 1)ग्रा.मा.क्र.18 व 19 रस्ते पुन डांबरीकरण, दुरूस्ती करण्याचा आदेश दिला असुन त्यास लागणारे 1कोटी 50 लक्ष रूपयांची सुध्दा तरतुद करण्यात यावी असे आदेश दिले 2)स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याकरिता दि 12/2/2004 रोजी च्या च्या शासन निर्णयाच्या अनुच्छेद च मधील बद्दल करून  31/12/2021या विडा वसाहतीस पर्यंत स्वतंत्र ग्रामपंचायत जाहीर करा अशी सुचना सुध्दा अधिकारी वर्गाला दिली. या मुळे ग्रामपंचायत स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णय मुळे वसाहतीमधील नागरिकांनी आंनद व्यक्त केला ह्या बैठकीस मा राजेश कुमार मिना अप्पर मुख्य सचिव ग्राम विकास विभाग, मा. देशमुख उपसचिव ग्रामविकास विभाग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. शेळकंदे ग्राम विकास विभाग जिल्हापरिषद सोलापुर आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

तर मग, राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना साक्षीला बोलवा ; काका साठे यांचा साक्षीदार म्हणून समोर येण्यास नकार….

Next Post

स्वच्छ भारत ग्रामीण सर्व्हेक्षण कार्यशाळेचे ऑनलाईन उद्घाटन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

स्वच्छ भारत ग्रामीण सर्व्हेक्षण कार्यशाळेचे ऑनलाईन उद्घाटन

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971600
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group