Monday, April 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | ‘NCP’ची या मतदारसंघावर “नजर” ! शिस्तीत सुरू आहे मोर्चेबांधणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 July 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे, एनसीपीचा सध्या सोलापूर महापालिकेच्या सत्तेवर डोळा असून महाविकास आघाडीच्या नावाखाली पद्धतशीर महेश कोठे यांना ताकद पुरवली जात आहे, शहरासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसने आता दोन मतदारसंघावर आपली नजर ठेवली आहे, त्यामध्ये शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर विधानसभेचा समावेश आहे. महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत चांगले यश मिळाल्यास उत्तर मतदारसंघात कोठेंची उमेदवारी निश्चित होऊन जाईल. 

दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासमोर नवखे असलेले बाबा मिस्त्री काय चालणार अशी चर्चा होती, दक्षिण तालुक्यातील भल्या  भल्या नेत्यांनी टांग मारली, आपले मतदारसंघ बदलले, काहीजण तर हॉस्पिटलमध्ये खाटाला धरून बसले  मात्र बाबा मिस्त्री यांनी चांगलीच फाईट दिली, काँग्रेस नेतृत्वाच्या दोन चार सभा आणि थोडीशी आर्थिक मदत झाली असती तर भाजपला बाबांनी धूळ चारली असती.

आता सत्तेच्या अडून दक्षिण तालुक्याचे नेते व अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्मारक समितीचे सदस्य बाळासाहेब बंडगर यांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे, बंडगर यांना लोक मामा म्हणत असल्याने हे मामा आता अनेकांना आपलेसे वाटू लागले आहेत, प्रत्येक आठवड्यात दोन चार दिवस मामा हे तालुक्यात असतात, गाठीभेटी, कार्यक्रम, लग्न, मयत या सर्वांना ते जात आहेत,  विशेष म्हणजे बंडगर मामा हे धनगर समाजाचे असल्याने तो समाज आणि त्या समाजातील युवक वर्ग त्यांच्याकडे खेचला जातोय, दक्षिण तालुक्यातील सीना नदीवरील बंदलगी बंधाऱ्याच्या विषयात मामांनी लक्ष घातलंय, सीना पट्ट्यातील शेतकऱ्यांचा हा विषय अस्मितेचा आहे.

बंडगर मामा सोबतच आता प्रदेश प्रवक्ते, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी (विधान परिषदेला संधी न मिळाल्याने) आपले लक्ष दक्षिणवर केंद्रित केले आहे. मागील काही दिवसात अनेक गावांत झंझावात दौरा करून पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा ओपन केल्या आहेत, यापूर्वीच उमेश पाटलांनी आपण भविष्यात दक्षिण विधानसभा लढवणार असे माध्यमांना सांगितले होते, 

उमेश पाटलांची हायटेक यंत्रणा आहे, अजितदादा यांच्या जवळचा नेता असल्याने सत्तेचा रुबाब त्यांच्या चालण्या, बोलण्यात आणि वागण्यात दिसून येतो, आता ते प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय “नागरिकांचा जनता दरबार” हा उपक्रम राबविणार आहेत याची सुरुवात अक्कलकोट तालुक्यातून होतेय. 

दक्षिण हा सर्वसामान्य माणसाला डोक्यावर घेणारा तालुका असल्याने जो सर्वात मिसळतो, सोबत बसतो, सुखादुखात येतो-जातो अशीच लोक चालतात, मग या सर्वात उमेश पाटील बसतात की  बंडगर मामा हे कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार नंतर पक्षच ठरवेल. आघाडीत हा तालुका काँग्रेसला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली मोर्चेबांधणी पद्धतशीर सुरू ठेवलीय हे मात्र नक्की.

SendShareTweetSend
Previous Post

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या डान्स पार्टीवर पोलिसांची धाड ! कोरोनात नियम तोडल्याने कारवाई

Next Post

थेट आत्महत्येची धमकी, कामावरून काढल्याचा राग, गुन्हा दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

थेट आत्महत्येची धमकी, कामावरून काढल्याचा राग, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974787
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group