सोलापूर- कॅन्सरसारख्या आजारावर मात करत देशाचे नेते शरदचंद्र पवार करीत असलेले काम देशाला भुषणावह असुन यांची प्रेरणा घेऊन युवकांनी गावासाठी ,समाजासाठी, काम करण्याचे आवाहन माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले.
राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस सोलापूर शहर व राजर्षी शाहू हाँस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोराेना काळात काम केलेल्या डॉक्टर,आशावर्कर,आराेग्य सेविका यांचा काेराेना याेध्दा म्हणून आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, पूनम बनसोडे, शैलजा राठोड, विद्या गवई डॉक्टर सोनाली घोंगडे, डॉक्टर रोहन वायचाळ,डॉ.प्रीती वायचाळ,डॉ. श्वेता कल्लुरकर,माधुरी थिटे,डॉ. नंदिनी देवकर ,डॉ रोहित बाकळे,डॉ मंदार हिरेमठ, डॉ.स्वरांजली पवार राष्ट्रवादी युवती सुप्रिया लोमटे,उषा बामणे, आरती हब्बू,श्रद्धा कावळे,प्रेरणा मैंदरगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राजकीय क्षेत्रात 52 वर्षापासून देशात, राज्यात नेतृत्व करणारे तर पंचवीस वर्षापासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करत अविरत काम करणारे देशाचे नेते शरद पवार यांचे कार्य सर्वासाठी दिशादर्शक असून त्यांचा आदर्श,प्रेरणा घेऊन युवकांनी काम करणे गरजेचे असल्याचे माने यांनी सांगितले. कोराेना काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या रणरागिनीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. शाहू हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू केल्याने या भागातील नागरिकांची सोय झाली. आजवर या केद्रावर 24 हजार लसीकरण झाले. पुढील काळात आपण अशीच सेवा करा नागरिकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील असे दिलीप माने यांनी म्हणाले.
यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार,यांनी काेराेना याेध्दाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. खासदार शरद पवार यांनी काेराेना काळात जनतेला धीर द्या, त्यांचे सोबत रहा, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. आम्ही जरी नागरिकात असलो तरी खरे योगदान तुमचे असल्याचे भारत जाधव यांनी सांगितले.
यावेळी , लता रणखांबे ,सरिता लोखंडे, वैशाली गवई,प्रियांका राठोड यांच्यासह आरोग्य सेविका , आशा वर्कर, परिचारिका उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे संयोजिका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा आरती हुळळे यांनी प्रास्ताविक तर सुत्रसंचालन उषा बामणे केले.
















