दक्षिण सोलापूर : सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्या अडेलतट्टू स्वभावामुळेच ग्रामपंचायत तसंच प्रशासनाची बदनामी होत असल्याचा आरोप माजी सरपंच तथा उपसरपंच सुभाष पाटोळे यांनी केलाय.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक तसेच सिमेंट कंपनीच्या करआकारणी वरून सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी गटविकास अधिकारी राहुल देसाई यांच्यावर विविध आरोप केला होता.
तसेच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक नेमणुकी वरून गटविकास अधिकारी यांनी टाळत असल्याचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी केला होता.
यासंदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली होती या भेटीत ठराविकच ग्रामसेवक मिळावा अशी मागणी केली होती.या सर्व घडामोडीत माजी सरपंच तथा उपसरपंच सुभाष पाटोळे यांची अनुपस्थिती होती..
दरम्यान सुभाष पाटोळे काही कामानिमित्त जिल्हा परिषदेत आले होते .सरपंचांच्या तक्रारीबाबत त्यांना विचारले असता सरपंचांच्या स्वभावातील अडेलतट्टू स्वभावामुळे गावची आणि प्रशासनाची बदनामी होत आहे. प्रशासनाकडून चांगलं काम होत असताना गेल्या दहा महिन्याच्या सरपंच कालावधीमध्ये पाच ग्रामसेवक बदलून गेले यातच सरपंचांचा स्वभाव कळून येतो..
विनाकारण प्रशासनाची बदनामी सुरू आहे कंपनीच्या करआकारणी ग्रामपंचायतीच्या अधिनियमांच्या विचार करूनच ती आकारण्यात आली आहे. ultrateck सिमेंट कंपनी यांचा टॅक्स 31/12/2015 चा शासन G R प्रमाणे मागील बॉडी ने आकारणी केली आहे जी शासन निर्णय प्रमाणे 30%पेक्षा जास्त वाढ करता येत नाही असा स्पष्ट उल्लेख आहे मागील 21लाखआहे 30%वाढ करून 2730000 होते तरी आम्ही 2755567 घेतले आहे त्यामुळे आता अपिलात निर्णय आम्ही केलेली कर आकारणी मध्ये बदल होईल असे वाटत नाही.
परंतु जगन्नाथ गायकवाड यांनी विकास कामाकडे लक्ष न देता अशा तक्रारीतून त्यांना काय साध्य होणार आहे असा सवाल माजी सरपंच तथा उपसरपंच सुभाषपाटोळे यांनी केले.


















