सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरातील काँग्रेस मधील नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत. याच घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde) यांनी बऱ्याच महिन्यानंतर काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थिती लावली. एकूणच पक्षाची होत असलेली पडझड पाहता त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेत सुद्धा पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तर दिले, खुप दिवसानंतर सुशीलकुमार शिंदे हे आक्रमक पाहायला मिळाले.
याचवेळी पत्रकारांनी सुधीर खरटमल (Sudhir kharatmal) यांच्या बाबत प्रश्न विचारला असता ते पक्षाचे अध्यक्ष होते त्यांनी दोन वेळा कॉंग्रेस सोडले आता ते आमचे नाहीत असे उत्तर दिले तसेच सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालणार का प्रश्नावर प्रणिती शिंदे या नेते आहेत मी आता रिटायर झालो अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले पहा सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले ते

















