कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील जिल्हा प्रशासन सतर्क आहे, तिसरी लाट ही प्रामुख्याने लहान मुलांसाठी असल्याचे संकेत असल्याने त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने काळजी घेण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामीण मध्ये आपल्या ग्रामपंचायत स्तरावर बैठका सुरू केल्या आहेत, तिसरी लाट येण्यापेक्षा मुलांना कोरूना होऊच नये यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर शून्य ते तीन या वयोगटातील बालके हे घरीच असतात तीन ते सहा वयोगटातील बालकांवर अंगणवाडी सेविकांची लक्ष असते, त्यामुळे शून्य ते सहा वयोगटातील बालकांना कोरोना झाल्यास ते हॉस्पिटलमध्ये राहू शकणार नाहीत त्यामुळे त्यांच्या पालकांना लवकरात लवकर 100% लसीकरण करून घेण्याकडे आपले प्रयत्न आहेत, सध्या सर्व बालकांची रक्त तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी त्यांच्या शरीरातील प्लेटलेट याची तपासणी करून घेण्यात येत आहे. पालकांसाठी कोरोना प्रतिबंधक विषयक मार्गदर्शक पुस्तिका काढण्यात येणार असून त्याचबरोबर त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.
ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच इतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये मुलांसाठी स्पेशल बेड उपलब्धता होण्यासाठी तयारी सुरू असल्याचे सीईओ स्वामी यांनी सांगितले. गुरुवारी पंढरपूर तालुक्यातील तावशी गावात झालेल्या ग्रामपंचायत व नागरिकांच्या बैठकीचे केंद्रीय ग्रामविकास विभागाने ट्विटरवर विशेष कौतूक केले आहे.


















