सोलापूर शहरात 12 एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण सापडला, त्यानंतर दिवसेंदिवस रुग्ण वाढत गेले याचा मोठा भार सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटल वर पडला, सिव्हीलच्या कर्मचाऱ्यांवर ताण आला, रुग्ण वाढू लागल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी भरती वैंशपायन मेडिकल कॉलेजने काढली त्यामध्ये एक्स-रे टेक्निशियन लॅब टेक्निशियन ईसीजी टेक्निशियन स्टाफ नर्स वॉर्डबॉय अशा जागा भरण्यात आल्या जागा भरताना तीन महिन्याचा करार या कर्मचाऱ्यांसोबत झाला होता दरम्यान त्यांचे तीन महिने संपले पुन्हा त्यांचा करार वाढून देणार असं सांगून कामावर रुजू करण्यात आलं दरम्यान दोन महिने पगारही दिला गेला नाही आणि अचानक मंगळवार 5 जानेवारी रोजी या 124 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची नोटीस देण्यात आली अचानक कामावरून कमी केल्याने हे कर्मचारी घाबरून गेले त्यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सिविल हॉस्पिटल कडून मागणी आल्यास मी तुम्हाला पुन्हा कामावर घेईन, असे आश्वासन दिले आहे, बुधवारी या कर्मचाऱ्यांनी शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये एकत्र येऊन अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची भेट झाली नाही यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका मांडताना कोरोना संसर्ग अजूनही कमी झालेला नाही कोव्हीडचे पेशंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत असे असताना आम्हाला कामावरून काढणे कितपत योग्य आहे असा सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला..