सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी मल्टिस्टेट साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अखेर बिनविरोध झाली. या निवडणुक प्रक्रियेतील उमेदवार यादी प्रसिद्ध करण्याचा सोमवार दिनांक 13 डिसेंबर हा दिवस होता सायंकाळी पाच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे हे यादी प्रसिद्ध करणार होते,
शुक्रवार 10 डिसेंबर रोजी 90 जणांनी माघार घेतली होती त्यामध्ये संचालक मंडळाच्या 20 जागांमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या दोन आणि सोसायटी मतदार संघातील एक अशा तीन जागा बिनविरोध झाल्या. ऊस उत्पादक मतदारसंघाच्या 15 जागांसाठी 21 तर अनुसूचित जाती जमाती मतदार संघाच्या दोन जागांसाठी तीन 17 जागांसाठी 24 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी ही 5 जणांनी शुक्रवारी माघार घेतल्याचे समजले.
सोमवारी सकाळी 12 च्या सुमारास संगमेश काडादी हे आपल्या दोन मुले आणि अनुसूचित जाती मतदारसंघातील उमेदवार शिवाजी इंगळे यांच्या सोबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आले, त्यावेळी संचालक सिद्धाराम चाकोते हे मागून आले त्यांनी बरीच मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मुलांना फोन लावून दिला मात्र संगमेश काडादी हे ऐकले नाहीत, त्यांनी पोलिसांना बोलवून घेतले,
नंतर गाडीजवळ ही काही लोक गेले मात्र मी आप्पासाहेब पाटील, अशोक पाटील कुणाला ओळखत नाही, धर्मराज काडादीना गरज आहे ना त्यांना फोन करायला लाव असे सांगत हात जोडून ते घरी निघून गेले.
त्यांच्या निवासस्थानी मनधरणी करण्यासाठी बाजार समिती संचालक आप्पासाहेब पाटील, किणीचे अशोक पाटील, महादेव पाटील, बाबुशा कोडते, सुधीर लांडे, डॉ हर्ष राऊत, मल्लिनाथ सोलापुरे, प्रभुराज मैंदर्गिकर गणेश चिंचोळी, यांच्यासह अनेक मान्यवर येत जात होते, किणीचे अशोक पाटील, अप्पासाहेब पाटील तर बराच वेळ ठाण मांडून होते, कुटुंबातील 3 काडादी चालतात तर मी चालत नाही का? मला एकट्याला घ्यायला काय अडचण, धर्मराज फोन का करत नाहीत? अशी कायम भूमिका संगमेश काडादी यांची होती.
एस एस वाले यांनीही पोट तिडकीने आपली भूमिका मांडली, एकट्या संगमेश काडादी यांना घ्या आम्ही बिनशर्त पाठिंबा देतो, मात्र संगमेश यांना घेण्यात धर्मराज तयार नव्हते, सायंकाळी सहा वाजता अप्पासाहेब पाटील, महादेव पाटील, सिद्धाराम चाकोते, अशोक पाटील हे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आले, यावेळी काडादी यांच्यातील कौटुंबिक वाद मिटवण्यात आम्ही सर्व यशस्वी झालो, धर्मराज काडादी यांचे चिरंजीव अण्णाराव काडादी हे संगमेश काडादी यांच्या घरी आले नंतर संगमेश काडादी व शिवाजी इंगळे यांनी बिनशर्त माघार घेतली असल्याचे सांगण्यात आले,
या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे नोटरीवर प्रतिज्ञापत्र लिहून देत माघार घेतली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी सांगितले .निवडणूक अर्ज माघारी नंतर दुसऱ्या दिवशी माघार घेण्याचे सहकार निवडणुकीत पहिल्यांदाच घडले. मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी अधिनियम 2002 त्यातलं शेड्यूल्ड या कायद्यानुसार अर्ज माघारीनंतर प्रतिज्ञापत्र देऊन माघार घेता येते अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी दिली.
दरम्यान संगमेश काडादी यांनी धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासस्थानावर जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी काडादी यांनी संमेश काडादी यांचा सत्कार केला आणि त्यांच्या तोंडात पेढा भरवला उपस्थित सर्वांनीच हे चित्र पाहून एकच जल्लोष केला
20 संचालक नावांची यादी ..
ऊस उत्पादक गट
2 महिला संचालक
श्रीदेवी भीमाशंकर माशाळे,
मंगला जयराज काडादी


















