सोलापूर : श्री सिद्धेश्वर मल्टिस्टेट साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची झालेल्या या निवडणुकीकडे राजकीय लक्ष लागले आहे. काडादी यांचे पारंपरिक विरोधक आपटे यांचे निधन झाले असून सिद्रामप्पा अब्दूलपूरकर मात्र निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्याची गुरुवारी शेवटचा दिवस आहे. बुधवारी 41 जणांनी अर्ज दाखल केले. आजपर्यंत एकूण 56 अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामध्ये 50 ऊस उत्पादक मतदार संघ व 4 अनुसूचित जाती व महिला मतदारसंघातून 2 असे अर्ज आले आहेत.
अर्ज दाखल केलेल्याची नावे पुढीलप्रमाणे आहेत..

















