सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. 06 डिसेंबर रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांच्या हस्ते प्रथमतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्रिशरण पंचशील (बुध्दवंदना) घेऊन अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमास जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर, महात्मा फुले महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास चर्मकार महामंडळ, अपंग विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, इतर मागासवर्ग कल्याण महामंडळ व सहायक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी, तालुका समन्वयक, प्रकल्प अधिकारी, बार्टी, समतादूत उपस्थित होते.
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...
सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...