Sunday, March 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : ‘सत्यवाना’ तुझी शिक्षा मला का रे बाबा..,चोर सोडून संन्याशीच सापडला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई: ‘शिक्षकाच्या नेमणुकीला मान्यता देण्याविषयीच्या प्रस्तावावर तीन महिन्यांत कायद्यानुसार योग्य तो निर्णय घ्यावा’, असा स्पष्ट आदेश दिल्यानंतरही आणि आदेशाचे पालन करण्याविषयी वारंवार संधी देऊनही अत्यंत उदासीन भूमिका घेत कोर्टाच्या आदेशांचा अवमान केल्याबद्दल मुंबई हायकोर्टाने सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्याला तब्बल एक लाख रुपयांचा दंड लावला आहे. तसेच दोन आठवड्यांत दंडाची रक्कम कोर्टात जमा केली नाही तर दोन दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे. 

सोलापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांना न्या. नितीन जामदार व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ही शिक्षा सुनावली. मात्र, दाद मागता यावी यासाठी बाबर यांच्या विनंतीवरून खंडपीठाने या शिक्षेची अंमलबजावणी आठ आठवड्यांसाठी स्थगितही ठेवली. कोर्टाच्या आदेशांचा अवमान केल्याच्या या प्रकरणात तत्कालीन काळात आदेश पालनाची जबाबदारी असलेले शिक्षणाधिकारी सत्यवान सोनावणे यांनी तर कोर्टाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसचीही पर्वा न करता मंगळवारच्या सुनावणीला हजेरी लावली नाही. त्यामुळे ‘रजिस्ट्रीने सोनावणे यांच्याविरोधात २५ हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करावे आणि ७ फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीला ते हजर राहतील याची खबरदारी घ्यावी. सध्या कोर्टांची सुनावणी ऑनलाईन होत असल्याने त्यांना हायकोर्टातील सरकारी वकील कार्यालयातून ऑनलाईन सुनावणीस हजर राहण्यास कळवावे’, असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.

‘राज्यभरात शिक्षण अधिकाऱ्यांचे निर्णय किंवा त्यांच्याकडून निर्णय न होणे, या प्रश्नावर हायकोर्टात अनेक याचिका येत असतात. कोर्टाच्या आदेशांचे पालन झाले नाही म्हणून कोर्ट अवमान कायद्याच्या अखत्यारीत अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्याच्या अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीने सरकारी वकील कार्यालयाने या आदेशाची प्रत राज्याच्या शिक्षण सचिवांकडे पाठवावी. जेणेकरून सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देता येतील’, असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?

शिक्षक दीपक कदम यांनी आपल्या नेमणुकीला मान्यता देण्याच्या प्रस्तावावर निर्णय होत नसल्याने राज्य सरकार व शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात रिट याचिका केली होती. महाराष्ट्र सरकारी सेवक बदली नियमावली आणि कर्तव्यपूर्ती विलंब प्रतिबंधक कायद्यांतर्गत सरकारी सेवकाने विशिष्ट मुदतीत निर्णय दिला नाही तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे. तरीही निर्णय होत नसल्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने कदम यांच्याविषयीच्या प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय देण्याचा आदेश १८ एप्रिल २०१८ रोजी दिला होता. त्याचे पालन झाले नसल्याने कदम यांनी अॅड. अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत अवमान याचिका दाखल केली. अवमान याचिकेचीही दखल घेत खंडपीठाने वारंवार संधी दिली. तरीही बाबर व सोनावणे यांनी कोर्टाच्या आदेशांविषयी उदासीन भूमिका घेतली. त्यामुळे कोर्टाने त्यांना कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला. तरीही ते गैरहजर राहिले.

कोर्टाचे आदेश कळवूनही अधिकारी प्रतिसाद देत नाहीत, असे खुद्द सरकारी वकिलांनीही कोर्टाला सांगितले. त्यानंतर ‘न्यायिक व्यवस्थेची आणि कोर्टाची अप्रतिष्ठा होणार नाही, याची खबरदारी घेणे आमचे कर्तव्य आहे. कायद्याचे राज्य हा लोकशाहीचा पाया असून त्याचे रक्षण करणे न्यायव्यवस्थेचे कर्तव्य आहे. न्यायव्यवस्थाही कायद्याच्या राज्यावरही प्रस्थापित आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशांचा अनादर हा थेट त्यावरच घाला असतो, असे खुद्द सुप्रीम कोर्टानेही स्पष्ट केलेले आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांची उदासीनता लक्षात घेता कोर्टाला कठोर भूमिका घेण्यावाचून पर्याय नाही. भास्कर बाबर हे कोर्ट अवमानाबद्दल दोषी ठरले आहेत’, असे आदेशात स्पष्ट करून खंडपीठाने त्यांना शिक्षा सुनावली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : अक्कलकोट ‘बीडीओ’ला नोटीस काढा | डेप्युटी सीईओ शेलकंदे ‘ऍक्शन’ मोडवर

Next Post

ब्रेकींग : सोलापूर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचे कोरोना बाबत नवे आदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : सोलापूर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचे कोरोना बाबत नवे आदेश

ताज्या बातम्या

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971717
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group