सोलापूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा १ डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सर्व शाळांना विविध मार्गदर्शक सूचना सरकारकडून देण्यात आल्या होत्या त्या सूचनांचे तंतोतंत पालन करून बुधवार एक डिसेंबरपासून राज्यभरात शाळा गजबजल्या.
शहरातील श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल येथे इयत्ता पहिली ते चौथी या वर्गाची आज घंटा वाजली. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याकरीता पालक खूप उत्साहित दिसून आले. पालकांनी विदयार्थ्यांना शाळेत सोडण्याकरीता मोठी गर्दी केली.
विदयार्थ्याच्या पहिल्या दिवसाचे स्वागत करण्याकरीता शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व सुपरवायझर खूप उत्साही दिसून आले. विदयार्थ्याच्या चेह-यावरील आनंद टिपण्यासारखा होता, विदयार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळी व फुलाच्या पायघडया पालण्यात आल्या होत्या.
विदयार्थ्याना औक्षण करून पेढा भरवून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्याकरीता विदयार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला. विदयार्थ्याकरीता शिक्षकांनी स्वहाताने तयार करण्यात आलेले फोटो फ्रेम शाळेचे पहिल्या दिवसाचे आकर्षण ठरले.
विदयार्थ्याच्या स्वागताकरिता शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, पालक सदस्य राजशेखर येळीकर यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक धनंजय सिरुर, पर्यवेक्षिका निर्मला परमशेट्टी, साकृतिक विभाग प्रमुख कोमल परांजपे, नूतन थोरवडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद विद्यार्थ्यांच्या स्वागताला उपस्थित होते.

















