सोलापूर शहरांमध्ये 12 एप्रिल 2020 रोजी पहिला कोरोनाचा संसर्गित रुग्ण आढळून आला त्यानंतर रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. पहिली लाट गेली दुसरी लाट 2021 च्या एप्रिल महिन्यात आली. यामध्ये सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण वाढले आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र एकूणच या सर्व कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सोलापूर शहरासाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी दिनांक 11 सप्टेंबर रोजी पाहायला मिळाली. महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाचा रिपोर्ट पाठवला जातो कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून साधारण सतरा महिन्यांमध्ये शनिवार 11 सप्टेंबर हा दिवस अतिशय आनंदाचा आहे,
त्याला कारण ही तितकेच महत्त्वाचे आहे, या दिवशी सोलापूर शहरात 480 कोरोनाच्या चाचण्या झाल्या मात्र यामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही तसेच एकही मृत्यू झालेला नाही ही फारच आनंदाची बाब म्हणावी लागेल. शनिवारच्या रिपोर्टवर समाधान न मानता अजूनही कोरूनाचा संसर्ग संपलेला नाही त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सोशल डिस्टन्स तोंडावर मास्क हॅन्ड सॅनिटायझरचा वापर हा गरजेचा आहे.
सोलापूर शहराची आजपर्यंतची आकडेवारी पाहिली असता
आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या
२९२२८, मृत्यूची संख्या १४४३, बरे झालेल्यांची संख्या २७७५७ , रुग्णालयात उपचार घेत असलेल्याची संख्या २८ इतकी आहे.





















