मोहोळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावात उमेशदादा आपल्या दारी, नागरिकांचा जनता दरबार हा उपक्रम हाती घेतला आहे.
12 डिसेंबर शरद पवार यांच्या वाढदिवसादिवशी हा जनता दरबार देगाव(वा) यागावी सायंकाळी सहा वाजता होता. उमेश पाटील यांचा गावात प्रवेश झाल्यानंतर त्यांना ग्रामस्थांनी खांद्यावर उचलून घेत वाजतगाजत मिरवणूक काढली, ते नागनाथ मंदिराकडे दर्शनासाठी जात होते. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मानाजी माने, मोहोळ नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, राहुल क्षीरसागर, अशोक क्षीरसागर ही प्रमुख नेते मंडळी सोबत होती.
याचवेळी एक वृद्ध महिला हातात काठी असताना आडवी धावत आली, तिला पाहताच सर्वजण थांबले, हलग्या थांबवल्या आणि तिचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. तिने आपल्या हातातील पिशवीतून एका कागदाचा गठ्ठा काढला आणि दाखवू लागली. तो गठ्ठा होता, त्या महिलेने पूर्वी ‘पल्स’या कंपनीमध्ये पॉलिसी भरली होती, तिला त्याचे पैसे मिळाले नाहीत, बाबा मला मारण्याअगोदर पैसे मिळवून दे,तेव्हा उमेश पाटील यांनी सर्व कागदाचे झेरॉक्स काढून द्या, मी पाठपुरावा करेन. यावेळी नेमके काय घडले पहा हा व्हिडीओ…


















