करमाळा : तक्रार अर्ज नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी वीस हजार रुपये लाच मागणार्या पोलिस नाईकास अँटी करप्शन पोलिसांनी अटक केली आहे
पोलीस नाईक गोरख आप्पा ढाकणे, करमाळा पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण (वर्ग ३) असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांच्या तक्रारी अर्जावरुन गुन्हा दाखल करणेकामी म्हणून २०,०००/- रुपये लाचेची मागणी करीत असलेबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे ०१ डिसेंबर २०२१ रोजी तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता यातील आरोपी गोरख आप्पा ढाकणे यांनी तक्रारदार यांना २५,००० रुपये लाचेची मागणी करुन, तडजोडी अंती २०,००० रुपये लाच मागणी केली. त्यातील पहिला हप्ता म्हणुन १०,००० रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले आहे. सदर प्रकरणात आरोपी लोकसेवक गोरख ढाकणे पोलीस नाईक यांना अटक करण्यात आली असुन पुढील कारवाई सुरु आहे.
ही कारवाई संजीव पाटील, सहा. पोलीस आयुक्त, लाप्रवि, सोलापूर, चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अंमलदार पोना प्रमोद पकाले, पोना अतुल घाडगे, मपोना अर्चना स्वामी, चापोकों शाम सुरवसे, सर्व नेमणुक लाप्रवि, सोलापूर.

















