सोलापूर विधान परिषदेची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 75 टक्के पेक्षा कमी संस्था असल्याचा मुद्दा पुढे करत राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे समर्थक सोलापुरातील भाजप नेते संतोष पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणी भारत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती या तक्रारीतील म्हणणे ऐकून निवडणूक आयोगाने आपल्याकडे दाखल करून घेतली आहे.
त्यानंतर जिल्ह्यातील सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन अक्कलकोट नगर पालिकेचे अशपाक बळोरगी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली मात्र ही याचिका फेटाळली गेली . शेवटी उच्च न्यायालयाच्या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयाच्या दरवाजा सोलापूरच्या नगरसेवकांनी ठोठावला आहे.
दरम्यान तक्रारदार अशपाक बळोरगी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. बळोरगी यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे ऍड अभयकुमार तायाल हे वकील देण्यात आले आहेत. या याचिकेमुळे सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शेवटचा आशेचा किरण निर्माण झालेला आहे.


















