सोलापूर : उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या बदली झालेल्या गटविकास अधिकारी जास्मिन शेख या सोलापूर जिल्ह्यामध्ये येण्यासाठी धडपड करत आहेत त्या उत्तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी असताना त्यांचा कार्यपद्धती व कारभारावरून सभापती रजनी भडकुंबे यांच्याशी वाद झाला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत या दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांनी सभापती आणि बिडिओ यांच्यामधील संवाद घडवून आणला तरी हा वाद सुरू होता. शेवटी बीडिओ शेख यांची तक्रार सभापती भडकुंबे यांच्यासह माजी आमदार दिलीप माने यांनी सुद्धा ग्रामविकास मंत्र्यांकडे केली होती त्यामुळे त्यांची वाशिम जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आली. परंतू त्या या बदली विरोधात मॅटमध्ये गेल्या मॅटने निकाल दिला.
जास्मिन शेख या सध्या जिल्हा परिषदेमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्या कार्यालयात चकरा मारताहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी परस्पर उत्तर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी पदावर पदभार देण्याचे पत्र दिले होते याच दरम्यान सोमवारी पत्रकारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन जास्मिन शेख यांच्या बाबत विचारणा केली.
बदलीनंतर शेख या मॅटमध्ये गेल्या परंतु मॅटने स्पष्ट निकाल दिला नाही नक्की त्यांना पुन्हा उत्तर पंचायत समितीच्या बीडीओ पदावर नियुक्ती केलेली नाही किंवा वाशिम जिल्ह्याची बदली रद्द केल्याचे स्पष्ट दिसत नाही जोपर्यंत ग्रामविकास विभागाकडून त्यांच्या नियुक्तीचा आदेश देत नाही तोपर्यंत यांना पदभार देता येत नाही अशी माहिती सीईओ स्वामी यांनी दिली.


















