सोलापूर : गुन्हा मागे घेण्याच्या कारणावरून देगाव रोड वरील हौसे वस्तीत पुन्हा हा रक्तरंजित शनिवार पाहायला मिळाला. यापूर्वी हौसे वस्ती अमराई परिसरात सकट आणि सनके या दोन गटात हाणामारी झाली होती त्यानंतर गुन्हे दाखल झाले या घटनेनंतर परत शनिवार 12 फेब्रुवारी रोजी सकट ग्रुपने सनके ग्रुपवर हल्ला केला वस्तऱ्याचा वार गळ्यावर गेला होता मात्र तो हुकवला आणि हा वार पाठीवर गेला त्यामुळे मोठी घटना टळली. याप्रकरणी गुन्हा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आकाश राजेंद्र सनके, वय- २३ वर्षे, रा. हौसे वस्ती आमराई, दमाणी नगर यांच्या फिर्यादी वरून
रामलिंग सकट, २) राजु सकट, ३) सुमित रुपनर, सर्व राहणार हौसे वस्ती आमराई यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास, वाई चौकातील गायत्री नाष्टा कॅन्टीनवर ही घटना घडली.
फिर्यादी आकाश सनके व त्याचे मित्र सुमित धोत्रे असे चहा पिण्यासाठी गायत्री नाष्टा कॅन्टीनवर गेले असता, रिक्षा क्रं. एम एच १३ सी टी ४३८८ मधुन आरोपी हे तेथे आले व रिक्षातुन खाली उतरुन फिर्यादीची गच्ची धरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन, दाखल केलेला गुन्हा मागे घे, नाहीतर तुला खल्लास करतो, असे म्हणून अर्वाच्च शिवीगाळ करुन फिर्यादीस गालावर चापटा मारल्या.
त्यावेळी हिसका मारुन फिर्यादी हे घराकडे पळुन जात असताना अमराई मधील श्रीकृष्ण सायकल मार्ट दुकानजवळ आले असता समोरुन रिक्षातुन वरील आरोपी हे पुन्हा आले व फिर्यादीस आरोपी रामलिंग सकट व सुमित रुपनर यांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण करुन आरोपी रामलिंग याने त्याचे खिशातुन वस्तरा काढुन फिर्यादीच्या गळयावर मारताना तो फिर्यादी खाली वाकुन चुकविल्याने वस्तरा फिर्यादीच्या पाठीला लागुन तो जखमी झाला. या घटनेचा तपास पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भोईटे हे करत आहेत.
















