मोहोळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निंबर्गी यांच्यावर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचा हातोडा पडल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली. प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी आपल्या अधिकारात मोहोळचे गटशिक्षणाधिकारी निंबर्गी यांचा तडकाफडकी पदभार काढून घेतला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या माहितीला दुजोरा दिला. मात्र अशोक भांजे यांची एवढी प्रकरणे बाहेर येऊनही त्यांच्यावर कोणत्या स्वामींची 🖐️🖐️ कृपा आहे याचा उलगडा झाला नाही, कारण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आडनाव जरी स्वामी असले तरी इतर स्वामींची बरीच चर्चा झेडपीत आहे.
नागणसुर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या विषयावरून अक्कलकोट पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ठराव मंजूर झाला मात्र प्रभारी गटविकास अधिकारी आयवळे यांनी ठरावावर सही करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. प्रभारी बीडीओ आयवळे आणि प्रभारी ‘गशि’ भांजे यांनी अक्कलकोट पंचायत समिती मध्ये बराच गोंधळ घातल्याची चर्चा अक्कलकोट तालुक्यात आहे.
आता तर अशोक भांजे यांच्या बाबत नवीनच चर्चा झेडपी मध्ये सुरू झाली आहे. ‘भांजे यांचा भतीजा कोण? ‘त्यांचे शिक्षण विभागात ये जा असते म्हणे, त्याची मजेदार चर्चा ही रंगली आहे.


















