सोलापूर लोकसभा मतदारसंघाची समन्वयक ही जबाबदारी मिळाल्यापासून अमर साबळे यांचे सोलापूर दौरे वाढले आहेत.
दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भंडारकवठे येथे आमदार सुभाष देशमुख यांच्या समवेत बूथ प्रमुखांशी टिफिन बैठक पार पडली. याप्रसंगी बूथ प्रमुखांशी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सवांद व आगामी संघटनात्मक कार्यक्रम या विषयी चर्चा झाली. यावेळी तालुका अध्यक्ष रामाप्पा चिवडशेट्टी, हनुमंत कुलकर्णी, यतीन शहा, श्रीमंत बंडगर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांनी तयारीला लागायचे असून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी आपणास पूर्ण ताकदीने काम करायचे आहे असे प्रतिपादन त्यांनी मनोगतात केले.