महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठका सुरु असून या माध्यमातून मतदारसंघातील स्थानिक नेतेमंडळी पदाधिकारी यांची मते जाणून घेतले जात आहेत. शनिवारी सोलापुर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे, AICC चिटणीस आशीष दुआ, AICC चिटणीस सोनल पटेल, नसीम खान, कुणाल पाटील, मोहन जोशी, उल्हास पवार व राज्यातील इतर नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन मुंबई येथे संपन्न झाली.
या बैठकीत सोलापुर लोकसभा निवडणूक २०२४ संदर्भात सर्व अधिकार सुशीलकुमार शिंदे यांना देण्याचा ठराव एकमताने सोलापुर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी मांडला. आणि त्यास सोलापुर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी अनुमोदन दिले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, काँग्रेसचे वातावरण चांगले आहे म्हणून गाफिल न राहता काँग्रेसचे संघटना मजबूत करा, लवकरच लोकसभा निवडणूक लागणार आहेत त्यासाठी तयारीला लागा. महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विचारांची माणसे आहे. सर्व समाजाला घेऊन जनतेची कामें करा. संघटना मजबूत असेल तर आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर जिल्ह्याची संघटना खंबीर आहे, आज सर्व पदाधिकाऱ्यांनी सोलापुर लोकसभा निवडणूक संदर्भात एकदिलाने शिंदे साहेबांकडे सर्व अधिकार देण्याचा ठराव मांडला. काहीतरी नवीन कांड करून निवडणूक जिंकण्याची भाजपची पद्धत आहे. आपण सर्व जण अतिआत्मविश्वासात न राहता काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू या
यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, मोदी लाट आणि जातीपातीचे समीकरणामुळे, पुलवामा हल्ला यामुळे सोलापुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. पण भाजपचा आणि खासदारांच्या बाबतील लोकांचा भ्रमनिरास झाला असून भाजप आमदारांच्या अपयशी कारभार, महानगरपालिकेतील भाजपचा भोंगळ कारभार यामुळे आत्ता जनतेला कळून चुकले आहे. हे लोक बोलबच्चन आहेत. सांगण्यालायक कोणतेही काम भाजपला करता आले नाही. म्हणुन आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून काँग्रेसचा विजय निश्चित आहे.
प्रदेश कार्याध्यक्षा माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, धनाजी साठे, रामहरि रूपनवर, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक रियाज हुंडेक़री, विनोद भोसले, महिला जिल्हा अध्यक्ष शाहीन शेख, प्रदेश चिटणीस किसन मेकाले गुरुजी, नरसिंह आसादे, पंडित सातपुते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड़, उदय चाकोते, बाबूराव म्हेत्रे, अरुण साठे, लक्ष्मीकांत साका, रफीक इनामदार, वाहिद बिजापुरे, तिरुपती परकीपंडला, दादा साठे, रूपेश गायकवाड, प्रतीक आबूटे, विश्वराज चाकोते, श्रद्धा हुल्लेनवरु, भीमराव बाळगे, सुधीर लांडे, रमेश हसापुरे, महेश जोकारे, वसीम पठाण, राजन कामत, पशुपती माशाळ, श्रीकांत वाडेकर, शुभम माने, मोतीराम चव्हाण, ऋषिकेश बोबड़े, नाना पालकर, अण्णा शिंदे, किशोर पवार, समीर शेख, अदनान शेख, सुभाष वाघमारे, महेंद्र शिंदे, राजकुमार पवार, पीयूष इंगळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


















