सोलापूर जिल्हा परिषदेचे माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे सदस्य त्रिभुवन धाईंजे यांनी महिला बालकल्याण विभागातील अंगणवाडी मध्ये वाटप करण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होता त्यांनी हा आरोप कागदोपत्री पुराव्यानिशी केला त्यांनी केलेल्या आरोपानंतर अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी त्रिसदस्यीय समिती चौकशीसाठी नेमली आहे मात्र या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही याच पार्श्वभूमीवर महिला बालकल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना पत्र पाठवून मार्च 2020 पर्यंतचे पोषण आहार पुरवठा केलेल्या महिला साहस संस्थेची बिले त्वरित अदा करावीत अशा सूचना केल्या आहेत एकीकडे पोषण आहार योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी समिती नेमली असताना दुसरीकडे इंद्रा मालो यांनी हे पत्र दिल्याची माहिती कळताच त्रिभुवन धाईंजे यांनी त्वरित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र काढले महिला साहस संस्थेचे बिल जर काढले तर जिल्हा परिषदेमध्ये आत्मदहन करेल असा इशारा त्यांनी पत्रात दिला, धाईंजे यांच्या लेटर बॉम्बने मंगळवारी जिल्हा परिषदेत खळबळ उडाली मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी या पत्राची दखल घेत धाइंजे यांना त्वरित आपल्या सहीने पत्र काढले आत्मदहन करू नये अशी विनंती स्वामी यांनी केली आहे.
धाइंजे यांच्याशी संपर्क साधला असता मी केलेल्या तक्रारीचा चौकशी अहवाल येईपर्यंत कोणतेही बिल काढू नये एकात्मिक बाल विकास योजना आयुक्त या काही शासन नाहीत कॅबिनेट मंत्रिमंडळात झालेला निर्णय हा शासन निर्णय होऊ शकतो त्यामुळे त्यांच्या पत्राला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महत्त्व देऊ नये अशी प्रतिक्रिया दिली.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या सदस्यांच्या लेटर बॉम्बची चर्चा आहे मागील तीन दिवसापूर्वी एका सदस्याने लेटर काढून मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी हे कामात निष्क्रिय आहेत त्यांना शासनाकडे परत पाठवा असा थेट आरोप केला होता या लेटर नंतर त्या सदस्याने आपणाला अपेक्षित असे काम आरोग्य विभागातून करून घेतले त्यानंतर तो सदस्य झेडपीत उत्साहात फिरताना दिसत आहे. कोणीही उठावे लेटर काढावे त्या सदस्याच्या आरोप वजा धमकी नंतर प्रशासन नाचताना दिसत आहे. पोषण आहार भ्रष्टाचार प्रकरणी नेमलेल्या समितीच्या कार्यपद्धतीवर सुध्दा त्रिभुवन धाइंजे यांनी संशय व्यक्त केला आहे.




















