सोलापूर : लग्न जमले, साखरपुडा झाला, लग्नाच्या अगोदरच शरीर संबंध ठेवले नंतर लग्नास नकार देत मुलगा दुसऱ्याच मुलीला पळवून घेऊन गेला. याप्रकरणी मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
जय श्रीनिवास गुर्रम वय 25 वर्षे रा कोंडा नगर, जुना विडी घरकुल सोलापुर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
क्षिरालिंग नगर, जुना विडी घरकुल भागात रहिवासी असलेल्या 24 वर्षीय पीडित मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मागील वर्षभरापासून आरोपी जय गुरम याने पीडिता काम करत असलेल्या ऑफिसमध्ये येऊन ओळख वाढवली, भेटीगाठी वाढल्या मुलगी नको म्हणत असतानाही जबरदस्तीने आरोपीने शरीरसंबंध ठेवले. दरम्यान 6 नोव्हेंबर 2021रोजी या दोघांचा साखरपुडा झाला. लग्नापर्यंत न थांबता साखरपुड्यानंतर ही जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले, काही दिवसानंतर लग्नाला नकार देत तो एका दुसर्या मुलीला घेऊन पळून गेला आहे अशी फिर्याद पीडिताने दाखल केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूनगार हे करीत आहेत.


















